इचलकरंजी,कोल्हापूर : यंदा होणार गोविंदांचा ‘जल्लोष’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनानंतर यंदा गोंविदा पथकेही दहीहंडीच्या तयारीत गुंतली आहेत. लाखांच्या घरात बक्षिसांची खैरात असणाऱ्या दसरा चौक, गुजरी कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, गंगावेश, राजारामपुरी येथील दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसोबतच नृत्याविष्कारांचीही झलकही यावेळी पाहायला मिळणार आहे.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळतो. शहरातील मध्यवर्ती भागात प्रतिवर्षी हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी गर्दी उसळते. मात्र, 2019 चा महापूर आणि 2020 नंतर आलेल्या कोरोना लाटेमुळे दहीहंडी साध्या पद्धतीने साजरी झाली. सामाजिक भान जपताना या दहीहंडी मंडळांनी पूरग्रस्तांना मदत, कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला होता. यंदा मात्र गोपाळकाल्याची जोरदार तयारी शहरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुंबई, पुण्याचे नृत्य पथकांचे बुकिंग सुरू आहे.

Join our WhatsApp group