कोल्हापूर ब्रेकिंग ; 150 कट्टर शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र, 45 फुट हार घालणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज, सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. खरी कॉर्नर येथील शिवसेना शहर कार्यालयात सायंकाळी 6 वाजता त्यांना 45 फुटी हार घालून शिवसेनेच्या प्रति निष्ठा व श्रध्दा व्यक्त करण्यासाठी 150 जणांच्या रक्ताने सही केलेले प्रतिज्ञापत्र देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकद्वारे दिली आहे.या पत्रकात म्हटले आहे, बंडखोराचं लोन आपल्या ठाकरी शैलीनं आणि शिवसैनिकांच्या ताकदीने परतावत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अवघ्या मराठी मुलखाला साद घातली आणि निष्ठावंत शिवसैनिक भगव्या झेंडयाखाली एकवटले आहेत. आज तीच निष्ठा शिवसैनिकांच्यात जागवत युवा नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आज, सोमवारी कोल्हापूर दौऱयावर येत आहेत. या निष्ठा यात्रेच्या दरम्यान त्यांचे शिवसेना शहर कार्यालय खरी कॉर्नर येथे सायंकाळी 6 वाजता 45 फुटी हार घालुन शिवसेनेच्या प्रति निष्ठा व श्रध्दा व्यक्त करण्यासाठी 150 जणांच्या रक्ताने सही केलेले शिवसेनेचे प्रतिज्ञापत्र ठाकरे यांना देणार आहेत. कोल्हापूर केवळ शिवसेनेचे आणि ठाकरेंचे आहे, हे ठणकावून सांगणारया विराट स्वागत सोहळ्यास स्वाभिमानी व हिंदुत्ववादी कोल्हापूरच्या नागरिकांनी सायंकाळी खरी कॉर्नर येथे जमावे असे आवाहन रविकिरण इंगवले यांनी केले आहे.

Join our WhatsApp group