बॉलिवूडचा सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान यापुढे स्वत:कडे बंदूक ठेवू शकणार आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानचा बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. सलमान खानला जीवे मारहण्याची धमकी आली होती.
या धमकीनंतर सलमान खानने 22 जुलै रोजी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी त्यांनी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मुंबई पोलिसांनी त्याला बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. त्यामुळे या पुढे तो स्वत:कडे सुरक्षेसाठी बंदूक ठेवू शकणार आहे.