संजय राऊत यांना कोर्टात हजर करणार, मुंबई सेशन कोर्टाबाहेर सुरक्षा वाढवली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेचे नेते (Shivsena) आणि खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. अखेर 16 तासांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री उशिरा त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. संजय राऊत यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक दिल्लीवरुन आले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन पथक याप्ररकरणाचा तपास करत आहेत. आधी संजय राऊत यांच्या घरी त्यानंतर ईडी कार्यालयात (ED Office) चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा हा 1034 कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे.

Join our WhatsApp group