Friday, March 29, 2024
Homeआरोग्यदिल्लीत कोरोनाचा धोका वाढला, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती

दिल्लीत कोरोनाचा धोका वाढला, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती



नवी दिल्ली; कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क/कव्हर घालणे पुन्हा एकदा सक्तीचे केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. खासगी चारचाकी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना ही सक्ती लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



पिंपरी : कोरोनापाठोपाठ वाढला स्वाइन फ्लूचाही धोका

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,२९९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख २५ हजारांवर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट वाढून ४.५८ टक्क्यांवर गेला आहे. मुख्यतः दिल्लीतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. दिल्लीत २४ तासांत २,१४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही मृतांची आकडेवारी १८० दिवसांतील सर्वाधिक आहे. याआधी फेब्रुवारीत दिल्लीमध्ये कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला होता.



गेल्या 24 तासात कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. याआधी मंगळवारी येथे २,४९५ रुग्ण आढळून आले होते. तर पॉझिटिव्हिटी रेट १५.४१ टक्के होता. या दिवशी ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याआधी २१ जानेवारी रोजी पॉझिटिव्हिटी रेट १८.०४ टक्क्यांवर पोहोचला होता. दिल्लीत कोरोनामुळे ऑगस्टमध्ये ४० लोकांचा बळी गेला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मृतांचा आकडा वाढला आहे. जुलै महिन्यातील अखेरच्या १० दिवसांत दिल्लीत १४ जणांचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -