उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथदेशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत.तर विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला. त्यानंतर जगदीप धनखड यांच्यावर देशभरातून मागरिट अल्वा यांचा पराभव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे, त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत.

अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांच मतदान पार पडून हा निकाल जाहीर झाला. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड विजयी झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मागरिट अल्वा यांचा पराभव केला. धनकड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आ उपराष्ट्रपतीपदासाठी 92.94 टक्के मतदान झाल.धनकड यांची कारकिर्द जगदीप धनकड यांची कारकिर्द पाहता, 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 1991 मध्ये धनकड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनखर यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Join our WhatsApp group