Friday, March 29, 2024
Homeबिजनेसभारतीय शेअर बाजाराच्या गटांगळ्या, सेन्सेक्समध्ये ‘एवढ्या’ अंकांची घसरण..

भारतीय शेअर बाजाराच्या गटांगळ्या, सेन्सेक्समध्ये ‘एवढ्या’ अंकांची घसरण..

अमेरिकन शेअर बाजारामध्ये (US Share Market) दोन वर्षांमधून सर्वात मोठी पडझड दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारामध्ये या घसरणीमुळे आशियाई (Asian Share Market) आणि भारतीय शेअर बाजारावरही (Indian Share Market) परिणाम दिसून येत आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत किती असेल कोणत्या कंपन्यांचे शेअर्स आज खाली जाऊ शकतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये 1 हजारापर्यंत अंकांची घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,153.96 अंकांनी म्हणजे जवळपास 1.91 टक्क्यांच्या घसरणीसह 59,417 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 298.90 अंकांनी म्हणजे 1.65 टक्क्यांच्या घसरणीसह 17,771 अंकावर खुला झाला.

आज सकाळी 9.30 वाजेच्या जवळपास सुमारास सेन्सेक्स 560 अंकांच्या घसरणीसह 60,011.05 अंकांवर होता. तर, निफ्टी 159 अंकांच्या घसरणीसह 17,910.80 अंकांवर व्यवहार करत असल्याचं समजतंय.

आजचा बिटकॉइन दर (Bitcoin rate): आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 16,18,641 रुपये आहे.

आजचा इथेरिअम कॉइनचा दर (Ethereum rate) भारतीय बाजारात 1,26,167 एवढा आहे.

आजचा Tether कॉईनचा दर भारतीय बाजारात 79.59 रुपये इतका आहे.

आजचा बायनान्स दर (Binance rate): भारतीय बाजारात आज बायनान्स कॉइनचा दर 22,135 रुपये इतका आहे.

आज रिपल कॉईनचा दर भारतीय बाजारात ₹ 28.20 रुपये इतका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -