भाजपचे नेते आल्यानंतर दारं बंद करा अन् कॅमेरे बाहेर काढा – माजी मंत्री जयंत पाटलांचे विधान

कामगारांच्या संरक्षणाआड येणाऱ्यांच्या विरोधात आता कामगारांनी भूमिका घेतली पाहिजे. कामगारांसाठी लढा तीव्र करण्याची गरज येत्या काळात आहेत. कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधी भूमिकेबद्दल एकत्र येऊन लढले पाहिजे. असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची आज पासून पन्हाळा येथे परिषदेला सुरवात झाली असून आज त्याचा उदघाटन सोहळा पार पडला. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले, “देशात कामगारांची संरक्षण चळवळ टिकवायची कशी ? हा कामगारांना प्रश्न पडला आहे. भारतातील लोकशाहीची चौकट मोडण्याचे काम आणि षडयंत्र सुरु आहे. कामगारांचे संरक्षण कमी करण्याचे धोरण हे जागतिक बँकेच्या धोरणाचा भाग असून या पध्दतीने कामगारांचा हक्क दाबून ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. त्यावर वेळीच चळवळ सुरु झाली पाहिजे.” असे मत व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले,”एफआरपी काढत असताना तेवढा पगार धरून काढली पाहिजे, तसेच हंगामी कामगारांचे वेतन धरूनच एफआरपी काढली पाहिजे. असे न झाल्यास साखर व्यवसाय आतून पोखरला जाईल. या सर्व गोष्टींची दक्षता कारखानदारांनी घेतली पाहिजे. तसेच कामगारांनी केंद्र सरकारवर दबाव आणून लढा दिला पाहिजे. कामगारांवर जे संकट आले आहे, ते संकट आपल्या दारात उभं आहे.” असे आवाहन त्यांनी केले.

Join our WhatsApp group