Saturday, April 20, 2024
Homeजरा हटकेDasara Wishes In Marathi 2022 - दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीमध्ये

Dasara Wishes In Marathi 2022 – दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीमध्ये



हिंदु पंचागानुसार अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील दशमीला विजयादशमी अर्थात दसरा सण साजरा केला जातो. दसऱ्याला ‘दशहरा’ असे देखील म्हटले जाते. दसरा सण हा सडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात. नवीन वाहन खरेदी, सोने खरेदी, नवीन कामाची सुरुवात केली जाते.

भारतात दसरा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यावर्षी नवरात्र 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आहे. तर आज नवरात्रीचा 9 वा दिवस आहे. उद्या म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाणार आहे. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो आणि या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसऱ्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. दरवर्षी दसऱ्यानिमित्त सर्वजण आपले नातेवाई, मित्रपरिवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देतात. यावर्षी दसऱ्यानिमित्त तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला मराठीमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करु शकता…

आनंदाचा सण,
प्रेमाचा वर्षाव..
गोडाचा प्रकार,
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुष्टांचा नाश, सर्वांचा विकास.
रावणाप्रमाणे प्रत्येक वाईट जळू दे,
आशा आणि विकासाची फुले फुलू दे.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बांधू तोरण दारी
काढू रांगोळी अंगणी
उत्सव सोने लुटण्याचा
करुनी उधळण सोन्याची
जपून नाती मनाची
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो
शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान राम तुमच्या यशाचा मार्ग उजळवत राहोत आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विजय प्राप्त होवो. दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -