ताजी बातमी ऑनलाईन टीम
मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 49 धावांनी पराभव केला. भारतीय संघ 18.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. तिसऱ्या T20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु दक्षि आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली.
रायली रोसोच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याप्रमाणे कोसळी आणि भरताला 18.3 षटकात सर्वबाद 178 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंदूरमधील सामना हरल्याने टीम इंडियाचे क्लीन स्वीपचे स्वप्नही भंगले. भारताच्या आजच्या पराभवाचे प्रमुख कारण सुमार गोलंदाजी, सुमार क्षेत्ररक्षण आणि सुमार फलंदाजी ठरले. भारतीय गोलंदाज धावा रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यानंतर फलंदाजांनी धावा करता आल्या नाहीत.