Friday, April 19, 2024
HomeबिजनेसCar Scam: सेकंड हँड कार खरेदी करताना तुमची होऊ शकते फसवणूक, घ्या...

Car Scam: सेकंड हँड कार खरेदी करताना तुमची होऊ शकते फसवणूक, घ्या ही काळजी

देशात सेकंड हँड कारची बाजारपेठ (Second Hand Car Market) वाढत आहे. लोक नवीन कार खरेदी करू शकत नाहीत ते सेकेंड हँड कार (Second Hand Car) खरेदी करण्यास प्राधान्य देतात. बऱ्याचदा कमी बजेटमध्ये चांगली सेकेंड हँड कार उपलब्ध होते म्हणून लोकं देखील सेकेंड हँड कार खरेदी करतात. मात्र, अनेक वेळा यात ग्राहकांची फसवणूक (Second Hand Car Scam) देखील होते. तुमच्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर सेकेंड हँड कार खरेदीपूर्वी काही गोष्टी नक्कीच तपासल्या पाहिजे. आजचा आमचा हा विषय त्याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला सेकेंड हँड कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी याविषयी सांगणार आहोत.

सेकंड हँड कार मार्केटमध्ये तुम्हाला बजेट कारपासून ते लक्झरी कार्सपर्यंत अत्यंत कमी किमतीत कार्स मिळतील. पण ही वाहने नेहमी बरोबर असतात असे नाही. या व्यवसाय असे अनेक डीलर्स आहेत जे तुम्हाला चुकीचे वाहने देऊन फसवणूक करतात. काही वाहनांवर तर खटला सुरू असतो.

नोंदणी तपासा
सेकंड हँड वाहन खरेदी करण्यापूर्वी संबंधित आरटीओमध्ये त्याची नोंदणी तपासा. कारण एखाद वेळेस तुम्ही घेत असलेल्या सेकेंड हँड वाहनातून काही गुन्हा देखील घडलेला असू शकतो. कारची नोंदणी तसेच इतर माहिती तुम्ही ऑनलाइन तपासू शकता. यात वाहनावरील चलन थकबाकी आहे किंवा नाही. कारचा कर पूर्ण भरला आहे का? आदी माहिती मिळते.

वैध विमा
सेकेंड हँड कार खरेदी करताना विम्याबाबत चौकशी करा. विम्याशिवाय कधीही कार खरेदी करू नका. कारण ज्या वाहनात कायदेशीर पेच नसतो अशाच वाहनांचा विमा कंपन्यांकडून विमा केला जातो. त्यामुळे ज्या कराचा विमा वैध असेल तीच कार खरेदी करा.

खरेदीनंतर गाडी नावावर करा
तुम्ही सेकेंड हँड कर खरेदी केली असेल तर कार खरेदी केल्यानंतर त्वरित ती कार तुमच्या नावावर हस्तांतरित करा. असे केल्याने तुम्ही कारचे मालक तर व्हाल मात्र कारबाबत इतर कोणाचा दावा असल्यास तोही तुमच्या लक्षात येईल.

कंपनी रेकॉर्ड
सेकेंड हँड कार (Second Hand Car) खरेदी करण्यापूर्वी कारचा कंपनी रेकॉर्ड तपासावा. यासाठी कारच्या नोंदणी क्रमांकावरून संबंधित ब्रँडच्या वर्कशॉपमध्ये जाऊन कारचा कंपनी रेकॉर्ड तपासू शकता. या रेकॉर्डमध्ये, कारची किती वेळा सर्व्हिसिंग केली आहे किंवा वाहनाची कोणती दुरुस्ती केली आहे हे लक्षात येते. यामुळे वाहनाच्या स्थितीचा अंदाज येतो. यासह गाडी किती किलोमीटर चालली आहे हे देखील लक्षात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -