पहिल्यांदाच किन्नरच्या भूमिकेत दिसणार Sushmita Sen, आगामी चित्रपट ‘Taali’ चा फर्स्ट लूक केला शेअर!

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबत सुष्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अशामध्ये आता सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या कामामुळे चर्चेत आली आहे. सुष्मिचा सेनेच्या आगामी ‘टाली’ चित्रपटाच्या (Taali Movie) फर्स्ट लूकने खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुष्मिता सेन पहिल्यांदात किन्नरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सुष्मिता सेनने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आगामी ‘टाली’ चित्रपटाचा फर्स्ट लूक (Taali Movie First Look ) शेअर केला आहे. सुष्मिताच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सुष्मिता सेनने फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘टाली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी!’ सुष्मिता सेनचा हा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे. या फोटोमध्ये सुष्मिता लाल आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. कपाळावर लाल रंगाची मोठी टिंकली, हातात घड्याळ, गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेली सुष्मिता टाळी वाजवताना दिसत आहे. सुष्मिताचा हा लूक पाहून वेबसिरीज किती धमाकेदार असणार आहे हे दिसून येत आहे.

सुष्मिता सेनचा आगामी ‘टाली’ चित्रपट ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. सुष्मिता पहिल्यांदाच एका चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. ही वेब सिरीज संपल्यानंतरच सुष्मिता सेन तिची हिट वेब सिरीज ‘आर्य 3’च्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुष्मिता सेन आगामी वेब सिरीजद्वारे सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचे आयुष्य पडद्यावर दाखवणार आहे. गौरी सावंत हे ते नाव आहे ज्यांनी ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांना आपल्या समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी खूप काम केले. या वेब सीरिजमध्ये गौरी आणि त्यांच्या दत्तक मुलीचे नाते दाखवण्यात येणार आहे.

Join our WhatsApp group