बँक ऑफ बडोदामध्ये 60 पदांसाठी भरती, उमेदवारांनी असा करा अर्ज!

नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आणि बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाने या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईटला bankofbaroda.in

भेट देऊन अर्ज करु शकतात.

बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 60 पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तर 9 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांना 9 नोव्हेंबर 2022 च्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी अधिसूचना वाचावी.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची प्रक्रिया – 19 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 नोव्हेंबर 2022

पदांचा तपशील

– एकूण पदं – 60 पदं
– सिनियर डेव्हलपर – फूल स्टॅक जावा – 16 पदं
– डेव्हलपर – फूल स्टॅक जावा – 13 पदं
– क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर्स – 6 पदं
– डेव्हलपर – फूल स्टॅक नेट अँड जावा – 6 पदं
– डेव्हलपर – मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट – 6 पदं
– ज्युनियर क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर – 5 पदं
– सिनियर डेव्हलपर मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट – 4 पदं
– सिनियर क्वॉलिटी अश्युरन्स लीड – 2 पदं
– सिनियर UI/ UX डिझायनर – 1 पद
– UI/ UX डिझायनर -1 पद

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स मध्ये पदवी घेतलेली असवी किंवा उमेदवाराने IT मध्ये पदवी घेतलेली असावी.

वयोमर्यादा

सिनियर डेव्हलपर – फूल स्टॅक जावा – 28 ते 40 वर्ष
डेव्हलपर – फूल स्टॅक जावा – 25 ते 35 वर्ष
क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर्स – 25 ते 35 वर्ष
डेव्हलपर – फूल स्टॅक नेट अँड जावा – 25 ते 35 वर्ष डेव्हलपर – मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट – 23 ते 30 वर्ष
ज्युनियर क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर – 23 ते 30 वर्ष
सिनियर डेव्हलपर मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट – 28 ते 40 वर्ष
सिनियर क्वॉलिटी अश्युरन्स लीड – 28 ते 40 वर्ष
सिनियर UI/ UX डिझायनर – 28 ते 40 वर्ष
UI/ UX डिझायनर – 25 ते 35 वर्ष

Join our WhatsApp group