शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना उतरणार ; संजय पवारांची घोषणा

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने उडी मारली आहे. सिनेट निवडणुकीत शिवसेना दहा जागांवर उमेदवार देणार असून,सांगली 3, सातारा 3 आणि कोल्हापूर साठी 4 जागा देण्याची घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली. आज माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने विद्यापीठ निवडणूकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. युवासेना माध्यमातून ठाकरे गटाची शिवसेना प्रथमच निवडणूक रिंगणात उतरली आहे.

आमचा विजय होणार हे निश्चित पत्रकारांशी संवाद साधताना संजय पवार म्हणाले, या निवडणुकीत सुटा,संभाजी ब्रिगेड,विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यार्थी विकास मंच रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे यंदा या निवडणुकीत प्रचंड चूरस पाहायला मिळणार आहे. मात्र विजय आमचाच होणार हे निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर आम्ही लढा उभारणार…

कणेरी मठात कर्नाटक भवनाच्या बांधकामाविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. कर्नाटक भवनला शिवसेनेनं कडाडून विरोध होत आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आमचा लढा कर्नाटक या नावाला आहे. कणेरी मठ इथं चालणाऱ्या सर्व कामाचे आम्ही कौतुक करतो.पण कर्नाटक नाव पुढे करणार असतील तर त्याविरोधात आम्ही लढा उभारणार असा इशाराही त्यांनी दिला.

Join our WhatsApp group