मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला!

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने आज म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही जॅकलिन फर्नांडिस वकिलाच्या वेशात कोर्टात पोहोचली. ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या (ED) तपासात जॅकलीन ही सहआरोपी आहे. सध्या या प्रकरणात जॅकलिनला दिलासा मिळाला असला तरीही तिचे पूर्ण टेंशन अद्याप संपलेले नाही.

सुनावणीत नेमके काय झाले?

कोर्टाने ईडीला विचारले की, तुम्ही चार्जशीटची कॉपी सर्व आरोपींना दिली आहे का? प्रत्युत्तरादाखल अभिनेत्रीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, ईडीने कोर्टाला चार्जशीटची कॉपी देणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतरही ती मिळाली नाही. सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये जॅकलिनच्या नावाचा समावेश होता. यानंतर कोर्टाने ईडीला चार्जशीटची कॉपी सर्व आरोपींना देण्यास सांगितले. केंद्रीय एजन्सीने यासाठी वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात पुढील तारीख दिली आणि तोपर्यंत जॅकलिनला दिलेला अंतरिम जामीन कायम ठेवला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी ती 26 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर झाली होती.

काय आहे प्रकरण?

200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.

जॅकलिनची यापूर्वीही अनेकदा झाली आहे चौकशी

या प्रकरणी ईडीने जॅकलिनची अनेकदा चौकशी केली आहे. या चौकशीत जॅकलिनने सांगितले की, तिला सुकेशसोबत लग्न करायचे होते. याशिवाय जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हेगार शाखेने 15 तास चौकशी केली होती.

Join our WhatsApp group