आर्थिक भरभराटीसाठी करा धन लक्ष्मी यंत्राची प्रतिष्ठापना, जाणून घ्या पूजा विधी


यंदा 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. अनेकांनी आपल्या घरांची स्वच्छता केली आहे. अनेकांनी लक्षी पूजेची तयारी देखील पूर्ण केली आहे. परंतु दिवाळीच्या दिवशी स्वच्छता आणि लक्ष्मी पुजेसोबतच धन लक्ष्मीच्या यंत्राची स्थापन करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. धनलक्ष्मी यंत्र हे संपत्ती आणि समृद्धीशी संबंधीत आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरी धन लक्ष्मी यंत्राची स्थापना केली जाते. श्री यंत्राच्या माध्यमातून देवी लक्ष्मी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. घरी धन लक्ष्मी यंत्र बसवल्यास संपत्ती, कीर्ती आणि यश प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत तुमच्या घरी देखील धन लक्ष्मी यंत्राची स्थापना करा. या यंत्राची प्रतिष्ठापना घरी कुठे आणि कशी करावी हे जाणून घेऊया.अशी करा धन लक्ष्मी यंत्राची प्रतिष्ठापना
तुम्ही घरात धन लक्ष्मी यंत्राची स्थान करत असाल तर ते अतिशय शुभ मानले जाते. धन लक्ष्मी यंत्रामुळे घरातील सदस्यांना सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते. परंतु धन लक्ष्मी यंत्राची प्रतिष्ठापना ही संपूर्ण विधीनुसार केली जाते. यासाठी सकाळी उठूण प्रातविधी आणि स्नान आटोपून घ्या. यानंतर पंचामृत आणि गंगाजलाने धन लक्ष्मी यंत्र स्वच्छ करून घ्या आणि ते घराच्या ईशान्य कोपर्‍यात लाल वस्त्रावर स्थापित करा. या दरम्यान ओम श्रीं ह्रीं श्रीं नमः या बीज मंत्राचा जप करा. हे लक्षात ठेवा की घरात धन लक्ष्मी यंत्राची स्थापना करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

धन लक्ष्मी यंत्राची पूजा विधी
धन लक्ष्मी यंत्राची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठूण आंघोळ करा आणि स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. यंत्र दूध आणि गंगाजलाने स्वच्छ करा आणि लाल वस्त्रांवर ठेवा. पूजेपूर्वी हे यंत्र पंचामृतात ठेवून त्यावर लाल चंदन शिंपडा, लाल गुलाबाची फुले आणि तांदूळ घेऊन यंत्रावर ठेवा आणि नंतर त्यावर लाल वस्त्र ठेवा. धनलक्ष्मी यंत्रासमोर तुपाचा दिवा लावा आणि यंत्राची आरती करा. तुम्ही ऊं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद आणि ऊं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम: या मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचा पूर्ण भक्तिभावाने जप केल्यास इच्छित धनप्राप्ती होते अशी मान्यता आहे. हे यंत्र तुम्ही कार्यालयात, तिजोरीत, मंदिरात किंवा स्वयंपाकघरात ठेवू शकता.

Join our WhatsApp group