Homeमहाराष्ट्र'गोकुळ'बाबत सर्कीट बेंचमध्ये मोठा निर्णय; अवसायनातील १९३ दूध संस्थांना मतदान अधिकार; हसन...

‘गोकुळ’बाबत सर्कीट बेंचमध्ये मोठा निर्णय; अवसायनातील १९३ दूध संस्थांना मतदान अधिकार; हसन मुश्रीफ, सतेज पाटलांना थेट फायदा?

‘गोकुळ’ दूध संघाच्या सभासद दूध संस्थांना अवसायनात काढण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या अपिलावर कोल्हापूर सर्किट बेंचकडे बुधवारी (ता. १२) सुनावणी पूर्ण झाली.

 

यामध्ये १९३ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थांच्या ठरावधारकांची संख्या वाढणार असून, त्याचा थेट फायदा कोणत्या गटाला होणार याबाबत येणारा काळ ठरवणार आहे.

 

सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर कृष्णा ठाकरे यांनी ‘गोकुळ’च्या ६४४ दूध संस्थांना अवसायनात काढले होते. त्यापैकी १९३ दूध संस्थांनी या निर्णयाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचकडे अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या संस्थांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे संबंधित संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, ‘गोकुळ’च्या माजी संचालकांनी संघाच्या पोटनियमाला झुगारून ४१० दूध संस्थांना सभासदत्व दिल्याचा आरोप करत वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली होती. माजी संचालकांनी सभासदत्व देण्याबाबत केलेल्या ठरावालाच बेलवाडे यांनी आव्हान दिले होते.

 

सध्या १९३ संस्थांच्या अपिलावर सर्किट बेंचकडे सुनावणी झाली आहे. मात्र, अवसायनात काढलेल्या उर्वरित संस्थांबाबतही अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्किट बेंचकडे दाद मागितलेल्या संस्थांना मिळालेल्या निर्णयाचा फायदा इतर अवसायनातील संस्थांनाही होऊ शकतो, असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

 

या निर्णयामुळे ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावधारकांच्या संख्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे दूध संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -