बुधवारी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. भरणी नक्षत्र प्रभाव दिवसभर 12 राशींवर असणार आहे. तर चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे.ग्रहांची स्थिती आणि गणपतीच्या आशीर्वादाने अनेक राशींसाठी नवीन संधी मिळणार आहे. असा बुधवारचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
तुमच्या नात्यातील किंवा भागीदारीतील एखादी गोष्ट समोर येणार आहे. आर्थिक प्रकरण अपूर्ण राहणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या सहकाऱ्यांसोबत जोडल्या जाणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
वैयक्तिक समस्यांमुळे तुम्हाला कामावर कठीण स्थिती राहणार आहे. कुठल्याही गोष्टीवर अंधाळा विश्वास न ठेवता विचारपूर्वीक काम करा. नात्यात जुने गैरसमज दूर होणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
तुम्हाला स्पष्ट आर्थिक चणचण जाणवणार आहे. भावनिक निर्णय न घेता व्यावहारी वागणे हिताचे ठरणार आहे. प्रेमात जुना वाद पुन्हा चर्चेला जाणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
ओळखीच्या व्यक्तीमुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे. मित्र किंवा कुटुंबाशी बोलल्याने एक वेगळा दृष्टिकोन तयार होणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
कामाच्या प्रचंड ओझ्या जाणवणार आहे. तुमच्यासमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा आणि चिडचिड जाणवणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या कामावर उपाय काढावा लागणार आहे. घरगुती गरजा, कौटुंबिक खर्च आणि अपेक्षा यात तुमची तारांबळ होणार आहे. जोडीदारासोबत जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
एखाद्या कामाबद्दल किंवा नात्याबद्दल तुम्हाला स्पष्टता मिळणार आहे. आर्थिक खर्च तुमची झोप उडवणार आहे. जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
तुमच्यासमोर आर्थिक उन्नतीसाठी पर्याय उभे राहणार आहे. कामाच्या ठिकाणी अनुभव व्यक्तीचा सल्ला कामी येणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या शब्दांपेक्षा त्याच्या वागणुकीकडे विशेष लक्ष द्या.
धनु (Sagittarius Zodiac)
आज एखादा निर्णय पुढे ढकलणे कठीण जाणार आहे. नोकरी बदलणे किंवा नात्यात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहे. केवळ सर्वात सोपा पर्याय हा योग्य निर्णय असेल असं नाही. अगदी घरी किंवा प्रेमाच्या नात्यातही, तुमच्या गरजा स्पष्टपणे मांडा.
मकर (Capricorn Zodiac)
आज कामाच्या ठिकाणी कोणाच्यातरी वागण्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. कोणी तुमच्या मेहनतीला गृहीत धरत असेल तर त्यांना स्पष्टपणे बोला. वाद न घालताही तुम्ही तुमची भूमिका टिकवून ठेवावी लागणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
तुम्हाला कामाच्या ठिकाणी काम आणि त्याचे श्रेय समान वाटणार नाही. तुम्ही एखाद्या प्रकल्पावर जास्त मेहनत घेतल त्याबद्दल तुमचं कौतुक होणार आहे. एखादा नवीन प्रकल्प किंवा उत्पन्नाचा मार्ग समोर येणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
तुम्हाला प्रतिसादाची वाट पाहावी लागणार आहे. वारंवार केलेल्या विनंत्यांमुळे परिस्थितीत लवकर बदल नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं आहे. प्रेमाच्या बाबतीत चित्र वेगळे राहणार आहे.
