Homeइचलकरंजीकामावर गेलेल्या माऊलीवर काळाचा घाव! खोतवाडीत यंत्रमागावर कांडी भरताना ओढणी अडकून 36...

कामावर गेलेल्या माऊलीवर काळाचा घाव! खोतवाडीत यंत्रमागावर कांडी भरताना ओढणी अडकून 36 वर्षीय महिलेचा मृत्यू

खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील अयोध्यानगर परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये ओढणी अडकून गळ्याला फास लागून महिलेचा मृत्यू झाला. आक्कुबाई महादेव पोवार (वय ३६, रा.गीताई प्ले स्कूलच्या मागे, खोतवाडी) असे मृत महिलेचे नाव (Ichalkaranji accident) आहे. ही दुर्घटना काल सकाळी पावणेदहाच्या सुमारास श्रीभु फॅब्रिक्स कारखान्यात घडली.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीभु फॅब्रिक्स या यंत्रमाग कारखान्यात आक्कुबाई नेहमीप्रमाणे आज सकाळी कामासाठी आल्या होत्या. सकाळी पावणेदहाच्या सुमारास मशीनमध्ये कांडी भरण्याचे काम करीत असताना त्यांच्या ड्रेसची ओढणी अचानक मशीनमध्ये अडकली. मशीनने ओढणी ओढल्याने ती त्यांच्या गळ्याभोवती आवळली गेली आणि फास लागून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली.

 

शहापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. याप्रकरणी कारखान्यातील दिवाणजी संतोष राच्चाप्पा बेळगी यांनी दिलेल्या वर्दीवरून शहापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आक्कुबाई पोवार यांच्या मागे दोन मुली, मुलगा व कुटुंबीय असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -