असं म्हटलं जातंय की कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, ही दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक आहे. मात्र सध्याच्या लाटेचा वेग हा दुसऱ्या लाटेहून कैक पटीनं मोठा आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात फेब्रुवारी 2021 मध्ये झाली. फेब्रुवारीत सरासरी 15 हजार रुग्ण निघत होते. तो आकडा 1 लाखांपर्यंत जाण्यास एप्रिल महिना उजाडावा लागला होता. म्हणजे दुसऱ्या लाटेत 15 हजार ते 1 लाखांपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी दीड महिने लागले होते. मात्र सध्या तेच अंतर फक्त 7 दिवसात पार झालंय. 30 डिसेंबरला भारतात 16 हजार रुग्ण निघाले होते आणि फक्त 7 दिवसातच तोच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा 1 लाख 17 हजारांवर गेलाय.
आतापर्यंतच्या 3 कोरोना लाटांमध्ये कमी दिवसात जास्तीत-जास्त रुग्णसंख्यावाढीचं प्रमाण कसं वाढत गेलं, ते सुद्धा समजून घ्या. पहिल्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण निघण्यासाठी 119 दिवस लागले होते. दुसऱ्या लाटेत तोच आकडा 1 लाख पर्यंत जाण्यासाठी 45 दिवस लागले. आणि सध्याच्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले.
मुंबई, पुणे, नागपूर तर हॉटस्पॉट आहेतच. मात्र ज्या जिल्ह्यांनी फक्त 15 दिवसांपूर्वी कोरोनाला हद्दपार केलं होतं, किंवा जिथं कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर आला होता, तिथंही पुन्हा रुग्णवाढ होऊ लागलीय. उदाहरणार्थ 25 डिसेंबरला मुंबईतल्या सक्रीय रुग्णांची संख्या फक्त 3703 इतकीच होती. ती आता 79 हजारांवर गेलीय. जळगाव जिल्हयात कोरोनाचे फक्त 9 रुग्ण होते, तो आकडा आता 91 वर गेलाय. धुळ्यात 15 दिवसांपूर्वी फक्त 4 रुग्ण होते, तोच आकडा कालपर्यंत 29 वर पोहोचलाय. 25 डिसेंबरला संपूर्ण अमरावती जिल्हयात कोरोनाचे फक्त 6 सक्रीय रुग्ण होते. बुलडाण्यात फक्त 7 रुग्ण होते, तो आकडा 31 वर पोहोचलाय. मात्र या रुग्णवाढीतली एक चांगली गोष्ट म्हणजे, रुग्णवाढ झालेली असली तरी रुग्णालयात भर्ती होण्याचं किंवा भर्ती झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन लागण्याच्या प्रमाणात
वाढ झालेली नाही.
महाराष्ट्रातील 338 निवासी डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे या 338 डॉक्टरांना मागच्या फक्त 4 दिवसातच कोरोनाची लागण झालीय. चंदीगडमध्ये फक्त 3 दिवसात 196 डॉक्टरांना कोरोना झालाय. मुंबईत फक्त 1 महिन्यात तीन हजार 516 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त मागच्या 6 दिवसात 6 पटीनं कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या कार्यालयात 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास, कोरोनाबाधित झालेयत.
कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक; मात्र लाटेचा वेग कैक पटीने मोठा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -