Monday, September 25, 2023
Homeब्रेकिंगवाढत्‍या रुग्‍णसंख्‍येच्‍या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज घेणार बैठक

वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येच्‍या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज घेणार बैठक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात कोरोनाचे रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्‍ये देशात १ लाख ५६ हजार ६३२ नवे रुग्‍ण आढळले आहेत. ( Covid-19 omicron variant ) शनिवारच्‍या तुलनेत ही संख्‍या तब्‍बल १३ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पश्‍चिम बंगाल आणि महाराष्‍ट्रामधील कोरोना संसर्गाची टक्‍केवारी सर्वाधिक आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येच्‍या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज महत्त्‍वपूर्ण बैठक घेणार आहेत.

देशात सध्‍या ५ लाख ९० हजार ६११ कोरोना रुग्‍ण आहेत. तर मागील २४ तासांमध्‍ये ३२७ जणांचा मृत्‍यू झाला आहे. वाढत्‍या रुग्‍ण संख्‍येची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. ( Covid-19 omicron variant ) आज सायंकाळी साडेवाजता पंतप्रधान मोदी उच्‍चस्‍तरीय बैठक घेतील. यामध्‍ये ते देशातील कोरोना स्‍थितीचा आढावा घेणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र