Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारचा आदेश : सलूनसोबत ब्युटी पार्लर अन् जीम सुरू राहणार !

राज्य सरकारचा आदेश : सलूनसोबत ब्युटी पार्लर अन् जीम सुरू राहणार !

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यामध्ये सलून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे राज्य सरकारचा आदेश होता. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यात वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.

या नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने म्हंटलं आहे की, “ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल”, असेही राज्य सरकारचा आदेश यामध्ये म्हंटलं आहे.

जीमदेखील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -