Tuesday, September 26, 2023
Homenewsअजित पवार यांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री; अजित पवारांचे धरले पाय

अजित पवार यांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री; अजित पवारांचे धरले पाय


उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या प्रत्येक भाषणात व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. आज (शनिवार) बारामतीजवळ कटफळ येथे आयोजित कार्यक्रमात ते अधिकाऱ्यांकडून ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती घेत होते. यावेळी एका दारुड्याने या ठिकाणी एन्ट्री करत थेट अजित पवार यांचे पाय पकडले. लोक दुपारीच चंद्रावर जायला लागलेत, त्यामुळे माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत अशी तंबी पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती पवार हे अधिकाऱ्यांकडून घेत होते. यावेळी एक तरुण गर्दीतून वाट काढत डुलतच त्यांच्याकडे आला. त्यांच्या पायाही पडला. सुरक्ष रक्षक आणि पोलिसांनी त्याला लागलीच बाजूला केले. बोल बाबा, आज काय दुपारीच चंद्रावर… काय चाललेय काय, अशी विचारणा पवार यांनी केली.
दारुड्यांमुळे गावात त्रास होत असल्याने दादा दारुधंदे बंद करायला पोलिसांना सांगा, अशी मागणी खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने केली. त्यावर पवार यांनी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आहेत का दौऱ्यात अशी विचारणा केली.

आता दुपारीच एकजण चंद्रावर गेला होता
भाषणात आता दुपारीच एकजण चंद्रावर गेला होता. त्याला म्हटलं, अरे अजून दुपार आहे, आज शनिवार आहे, तर काय आता करता..
काही काही जण व्यसनाधीन झाल्यावर पुढे त्रास होतो. त्यांना व्यसनापासून बाजूला करण्याचे काम आपण सगळ्यांनी केले पाहिजे असे सांगत माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत, अशा धंद्यांवर कारवाई करा असे आदेश पवार यांनी दिले.

7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन
राज्याचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी बारामती दौऱ्यात दिली.
विकासकामांसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करत ते माझ्यासमोर सादर करा. म्हणजे पुरवणी मागण्यांमध्ये त्याचा समावेश करता येईल, असे आदेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र