Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रप्लास्टिक पिशवी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कांदे फेकले

प्लास्टिक पिशवी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कांदे फेकले

कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई गलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रितसर तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या घटनेचा म्युनिसिपल कामगार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदी बाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी सांगितले.
या घटनेनंतर म्युनिसिपल कामगार संघटनेने निषेध नोंदवला आहे. एपीएमसीमध्ये कारवाई हे आमचे काम नाही यासाठी एपीएमसीने स्वतंत्र पथक नेमले पाहिजे. आज हा हल्ला झालाय, या घटनेचा म्युनिसिपल कामगार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून मारहाण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -