Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा अवकाळीसह गारपीट

राज्यात पुन्हा अवकाळीसह गारपीट

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणाऱ्या वाऱ्यामुळं महाराष्ट्रातील काही ठिकाणासंह मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीनं 9 ते 13 जानेवारी पर्यंतचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार आज विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी केला आहे.

उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळं मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 ते13 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आगामी दोन दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं आणखी एकदा नुकसान होण्याची भीती आहे.काल झालेल्या गारपीटीमुळं वर्धा जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -