Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी १८५ नवे बाधित

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी १८५ नवे बाधित


सोमवारीही कोरोना रुग्णांच्या संख्येत -झपाटयाने वाढ झाली असून सोमवारी जिल्हयात १८५ नवे कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३१ कोरोना बाधित हे केवळ कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू लागला असल्याने सर्वांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी १३४३ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, त्यामध्ये कोरोनाचे १८५ नवे बाधित रुग्ण आढळून आले. मात्र ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता ९२३ वर पोहोचली आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्राबरोबरच जिल्हयाच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाचे नव बाधित आढळून येऊ लागल्याने संपूर्ण जिल्हयाची आरोग्य यंत्रणा गतीमान झाली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी सांगितले.
सोमवारी आढळून आलेल्या १८५ कोरोनो बाधितामध्ये आजरा-२, गडहिंग्जल-२, हातकणंगले-५, करवीर-१३, पन्हाळा २, राधानगरी-४, शाहुवाडी -१, आणि शिरोळ तालुका-२ तर इचलकरंजी नगरपरिषद – १२, जयसिंगपूर नगरपरिषद -२, गडहिंग्लज नगरपरिषद-३, हुपरी नगरपरिषद-१ आणि पेठवडगांव नगरपरिषदेमध्ये एक जण आणि अन्य जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण २ लाख ७ हजार ९५८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १ हजार २३५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ५८१ इतकी असून दवाखान्यात अॅडमिट असलेले ९२३ रुग्ण आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक नागरिकांने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगची पालन करणे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे, प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही डॉ. साळे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -