Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमार्चनंतरच ओसरणार कोरोनाची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा

मार्चनंतरच ओसरणार कोरोनाची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिसर्‍या लाटेचा ‘पीक’ (रुग्णसंख्येचा उच्चांक) येईल. या काळात दररोज 4 ते 8 लाख नवे रुग्ण आढळतील. दिल्ली आणि मुंबईत 15 जानेवारीला रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल.

आयआयटी’तील (कानपूर) गणित आणि संगणक विज्ञान या विषयांचे प्रा. मनींद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तविला असून, या संशोधनासाठी त्यांनी संगणकीय पद्धत वापरली आहे. प्रा. अग्रवाल यांनी 15 मार्चच्या जवळपास लाट ओसरण्यास सुरुवात होईल, असेही नमूद केले आहे.

मुंबईत तिसर्‍या लाटेतील रुग्णसंख्येची उसळी 15 जानेवारीला होईल. दिल्लीतही असेच घडेल. आमच्याकडे संपूर्ण देशाची आकडेवारी नसली; तरी सुरुवातीचे जे काही आकडे उपलब्ध आहेत, त्यावरून फेब्रुवारीत तिसर्‍या लाटेचा ‘पीक’ येणार, असा स्पष्ट अंदाज बांधण्यास वाव आहे.

पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन लागू होता. प्रादुर्भावाचा वेग त्यामुळे दुपटीने कमी झाला. दुसर्‍या लाटेत प्रत्येक राज्याने आपापल्या परीने धोरणे राबविली. ज्या राज्यांनी लॉकडाऊन (मग तो अंशकालीन का असेना) लागू केले, त्या राज्यांतून प्रादुर्भावाचा वेग कमी झाल्याचे पाहायला मिळाले. याचाच अर्थ लॉकडाऊन हा संक्रमण रोखण्याचा एक पर्याय आहेच, असे प्रा. अग्रवाल यांनी सांगितले.


RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -