ताजी बातमी ऑनलाइन टीम
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत धारदार शस्त्राने अत्यंत क्रूरपणे छातीच्या उजव्या बाजूस भोसकून गंभीर जखमी केले. उपचारासाठी नेल्यानंतर त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना माढा तालुक्यातील दहिवली येथे रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीस टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे.
अश्विनी सुनील पोटरे (वय 30, रा. दहिवली, ता. माढा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ चांगदेव पोटरे (वय 31, रा. दहिवली) याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पती सुनील चांगदेव पोटरे (रा. दहिवली, ता. माढा) यास पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, आरोपी सुनील पोटरे हा पत्नीशी चारित्र्याच्या संशयावरून नेहमी भांडत असे. त्यातूनच त्याने रविवारी दुपारी अश्विनीशी भांडण काढले. त्यातून त्याने पत्नीच्या छातीवर अज्ञात धारदार शस्त्राने वार केला. अश्विनीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेजारील वस्तीवर राहणारा आरोपी पोटरेचा भाऊ रघुनाथ पोटरे व त्याच्या कुटुंबीयांनी सुनील याच्या घराकडे धाव घेतली. दरवाजा बंद असल्याने त्यांनी मागील पत्राशेडमधून आत प्रवेश केला. तोपर्यंत सुनीलने पत्नीवर वार करून तिला जखमी केले होते.
जखमी अश्विनीस वाहनातून टेंभुर्णी येथे उपचारासाठी हलविले. परंतु रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुढील उपचारासाठी ताबडतोब सोलापूरला हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच अश्विनीचा मृत्यू झाला. मृत अश्विनीला मुलगी वैष्णवी व मुलगा शुभम अशी दोन मुले आहेत. करमाळा तालुक्यातील कविटगाव हे अश्विनीचे माहेर आहे.
टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनाजी ओमासे करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून भोसकून पत्नीचा खून
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -