Monday, April 22, 2024
Homeकोल्हापूरमंडलिकांनी नवीन काय ठरविलंय हे त्यांनाच माहीत : ना. मुश्रीफ

मंडलिकांनी नवीन काय ठरविलंय हे त्यांनाच माहीत : ना. मुश्रीफ

ताजी बातमी ऑनलाईन टीम
खासदार संजय मंडलिक यांनी नवीन काय ठरविलंय हे त्यांनाच माहीत. त्यांचं काय ठरलंय, काय ठरविलंय हे त्यांनाच विचारा, अशा शब्दात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

रविवारी मंडलिक यांनी शिवसेना मेळाव्यात आम ठरलंय म्हणून आम्हाला गृहीत धरू नका. तर आता नवीन ठरलंय आणि ते टोकाला नेणारच, अशी जाहीर भूमिका मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता मुश्रीफ म्हणाले, आता संजय मंडलिकांनी काय ठरविलंय, त्यांचं काय ठरलंय हे मी कसं सांगणार. ते त्यांनाच माहीत असेल. भविष्यात जनताच काय ते ठरवेल. आज बोलून त्याचा काय उपयोग?
राज्यात निर्बंध लागू करताना विरोधी पक्षाला विचारात घेतले नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याविषयी विचारता मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संंदर्भातील निर्बंधाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सूचना पाठविल्या त्याची केवळ राज्य सरकारने अंमलबजावणी केली आहे. आता याबाबत जर चंद्रकांत पाटील यांना माहिती नसेल तर ही माहिती आम्ही पंतप्रधानांपर्यंत
पोहोचवू.

शिवसेनेचे सहा आमदार पूर्वी निवडून आले होते. आता पुन्हा एकदा सहा आमदार निवडून आणण्याची घोषणा रविवारी झालेल्या शिवसेना मेळाव्यात करण्यात आली. त्याबाबत विचारता मुश्रीफ यांनी सहा कशाला बारा जागा घ्या, असे म्हणत पूर्वीच्या विधानसभा जागांचा संदर्भ दिला. मात्र लगेच हे दुरुस्त करीत त्यांनी सहा नको, दहाही जागा घ्या. सहा म्हणजे खूप कमी जागा होतात, अशा शब्दात उत्तर दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -