Saturday, July 27, 2024
Homeसांगलीसांगली जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू, नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई

सांगली जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू, नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई

कोरोना प्रतिबंधासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी तर रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लग्न समारंभ आणि अंत्ययात्रेवर देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

डॉ. चौधरी म्हणाले, सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये देखील नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, खासगी आस्थांपनामध्ये केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांना परवागी असेल. उर्वरित कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना द्याव्यात. शासकीय कार्यालयात देखील संबंधित अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लग्न समारंभ 50 तर अंत्ययात्रेसाठी 20 जणांना परवानगी आहे. मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. सलून, ब्युटी सलून इत्यादींना 50 टक्के क्षमतेने परवानगी आहे. परंतु केशकर्तन करणार्‍या कर्मचार्‍याचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. जलतरण तलाव, स्पा सेंटर, करमणूकनगरी, प्राणी संग्रहालये बंद असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -