Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात लॉकडाऊन होईल : मंत्री...

ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात लॉकडाऊन होईल : मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात सोमवारी दिवसभरात 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 हजार 671 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 28 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. पुणे ग्रामीण 2 पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण सापडलाय. आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.467 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

राज्यात ज्या वेळेस 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, त्यादिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर पत्रकारांना दिलीय…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -