Sunday, December 22, 2024
Homeक्रीडापैलवान सागरला मारण्यापूर्वी सुशाल कुमारने कुत्र्यांवर गोळ्या का झाडल्या?

पैलवान सागरला मारण्यापूर्वी सुशाल कुमारने कुत्र्यांवर गोळ्या का झाडल्या?

पैलवान सागर धनखड यांच्या हत्ये प्रकरणी ऑलम्पिक मेडल विजेता सुशिल कुमार याच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. ५ मे २०२१ रोजी २७ वर्षाचे पैलवान सागर धनखड यांची हत्या छत्रसाल स्टेडियम मध्ये केली होती. पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी पैलवान सुशिल कुमार याला अटक केली होती. सुशिल कुमार काही दिवस फरारही होता.सोमवारी १० जानेवारी रोजी याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सुशील कुमार घटनेच्या रात्री छत्रसाल स्टेडियममध्ये पोहोचला आणि त्याने कुत्र्यांवर गोळीबार केला. यानंतर त्याने स्टेडियममध्ये आधीच उपस्थित असलेल्या कुस्तीपटूंना बंदुकीच्या धाकावर धमकावले.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहिणी न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात सुशील कुमारसह चार जणांना आरोपी करण्यात आले आहे. अनिल धीमान व इतरांच्या चौकशीत या लोकांची नावे पुढे आली होती. अनिल धीमान हे २०१९ पासून सुशील कुमारचे अंगरक्षक होते आणि सुशीलची खाजगी आणि अधिकृत कामेही ते पाहत होते.

धीमान याने सांगितले की, घटनेच्या रात्री धीमान सुशील कुमार सोबतच होता. घटने दिवशी सुशील कुमारने आपल्या अनेक सहकाऱ्यांना छत्रसाल स्टेडियमच्या बास्केटबॉल ग्राऊंडवर बालवले होते. त्याला तिथल्या काही लोकांना धडा शिकवायचा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -