Thursday, May 30, 2024
Homeमनोरंजनअलिया भट्टने लाथ मारली आणि कियारा अडवाणीचं नशीब पालटलं !

अलिया भट्टने लाथ मारली आणि कियारा अडवाणीचं नशीब पालटलं !

फिल्मी जगातात जेव्हा एखादा प्रसिद्ध कलाकारांला कुठल्या ना कुठल्या कारणाने चित्रपट सोडण्याची वेळ येते तेव्हा ज्युनिअर कलाकाराला संधी मिळते. यानंतर ज्युनिअर कलाकार या संधीचं सोनं करतो. असंच काहीसं नुकतेच घडलं आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ हा चित्रपटात कियारा अडवानीच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्टला ऑफर मिळाली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट ओटीटीवर सर्वात यशस्वी चित्रपटापैकी एक ठरला. या चित्रपटात सिद्धार्थसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी दिसली. यानंतर तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. परतु, माहिती आहे का, या चित्रपटासाठी पहिल्यांदा दिग्दर्शक करण जौहरने कियारा नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला ऑफर दिली होती. आपल्या बिझी शेड्युलमुळे आलियाने ही ऑफर नाकारली आणि कियाराला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

यानंतर तिने या संधीचं सोनं करत ‘शेरशाह’ हा चित्रपट हिट ठरला. हा चित्रपट ओटीटीवर खूपच गाजला. चित्रपटातील कियाराची भूमिका चाहत्यांच्या पंसतीस उतरली आणि कियारा अल्पावधीतच नंबर वन हिरोइन्सच्या यादीत पोहोचली. सध्या ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -