Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; पण धोका नाही

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; पण धोका नाही

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट वाढत आहे. बाधितांचे प्रमाण वाढत असले, तरी धोका नाही, असेच चित्र सध्या आहे. कारण, बाधित रुग्णांपैकी तब्बल 90.82 टक्के रग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी बहुतांश जणांना लक्षणेच नाहीत, तर उर्वरित रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यात दुसर्‍या लाटेची तीव्रता होती. मे महिन्यात जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 20.6 पर्यंत गेला होता. तत्पूर्वी पहिल्या लाटेत हाच सरासरी रेट 28.6 पर्यंत होता. दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षाही कमी होता. तिसर्‍या लाटेत दहा दिवसांत जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यावरून 20 टक्क्यांपर्यंत गेला आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 12.39 टक्के इतका राहिला आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांचे प्रमाण हे केवळ 9.18 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या 1396 इतकी आहे. त्यातील केवळ 135 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित 1,261 रुग्ण घरीच आहेत. जिल्ह्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -