Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनआई कधी होणार, प्रियांकानं कुटुंब नियोजनाबाबत केला मोठा खुलासा

आई कधी होणार, प्रियांकानं कुटुंब नियोजनाबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास दोघेजण वैवाहिक जीवनात आनंदात असून त्याच्या लग्नाला नुकतेच ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियांका आणि निकने १ डिसेंबर २०१८मध्ये जयपूरमध्ये लग्न केलं होतं. दोघेजण एकत्रित स्पॉट झाल्यावर त्यांना कुटुंब नियोजनाबाबत विचारले जाते. याच दरम्यान प्रियांकाने कुटुंब नियोजनाबाबतचा खुलासा केला आहे.

प्रियांकाने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत कुटुंब नियोजन आणि मुलांबद्दल सांगितले आहे. यात तिने ‘कुटुंब नियोजन हे भविष्यातील योजनेचा एक भाग आहे, मला आई व्हायचे आहे. देवाच्या कृपेने ते होईल तेव्हा होईल, पण आम्हाला घाई करायची नाही. मुले झाल्यावरही मी माझे काम जबाबदारीने करण्यात आघाडीवर राहीन.’ असे म्हटले आहे.

यानंतर मुलाखतीत प्रियांकाला ‘मी आणि निक दोघांचे बिझी शेड्युल असते, मग हे कसे काय शक्य आहे?.’ यावर उत्तर देताना प्रियांका म्हणते, ‘मी इतकी ही बिझी नाही की माझ्या कुटुंबाकडे लक्ष देवू शकणार नाही.’ यापुढे तिला आई होण्याबद्दल तुझं मत काय? असे विचारले असता तिने ‘घर घेणे आणि मुलांना जन्म देणे या दोन्ही गोष्टींना मी नेहमीच प्राधान्य दिले आहे, मी बिझी आहे पण मला माझ्या घरापासून दूर राहायचे नाही. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत त्या करण्याची माझी इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -