ताजी बातमी ऑनलाइन टीम
दुचाकीवरून येऊन धूम स्टाईलने चोर्या करणार्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आले आहे. त्यापैकी सचिन ऊर्फ पोप्या गौतम माने (वय 31) आणि महेश विद्याधर बाबर (26, रा . दोघे इंदिरानगर झोपडपट्टी) या संशयितांना अटक केली आहे. एकजण फरार आहे. एक अल्पवयीन युवक ताब्यात घेतला आहे.
या चारजणांकडून 23 मोबाईल आणि एक दुचाकी असा 3 लाख 47 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अजित टेके, पोलिस निरिक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हा फरार असून एक संशयित अल्पवयीन आहे.
गेल्या काही दिवसात धूम स्टाईलने चोरी करणार्या टोळीने धुमाकूळ घातला होता. सांगली आणि सांगलीवाडी येथे चार ठिकाणी चौघांचे मोबाईल हिसडा मारून घेऊन ते पसार झाले होते. त्यात एकाने मोबाईल देण्यास विरोध केल्याने झालेल्या झटापटीत तो जखमी झाला होता.
या प्रकरणांचा तपास करीत असताना माने आणि बाबर हे येथील गणेश मार्केटमध्ये मोबाईलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता चार मोबाईल मिळाले. विना क्रमांकाची दुचाकी तपासली असता त्यात 13 मोबाईल सापडले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे मोबाईल त्यांनी सांगलीवाडी, बायपास रस्ता, येथील कॉलेज कॉर्नर परिसरात हिसडा मारून पळवल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आता पर्यंत 23 गुन्हे उघड झाले आहेत. त्याशिवाय त्यांच्या घरातून चोरीचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडील 12 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांच्या विरोधात दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत समीर ढेरे, विनायक शिंदे, ए. व्ही. दोरकर, विक्रम खोत, राजेश पाटील आदिंनी सहभाग घेतला.
सांगली मध्ये धूम टोळीचा छडा; दोघांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -