दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी) याने राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केला होता. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याना आज अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार, अंबाई टँक कॉलनी येथे महिन्यापूर्वी बेछूट गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग बोंद्रे (वय ४०, रा. अंबाई टँक कॉलनी कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने आज (दि.१५) मध्यरात्री अटक केली.