उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Up Election 2022) पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात 57 उमेदवारांची तर दुसऱ्या टप्प्यात 38 मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. तर केशव मोर्या हे सीराथू विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरतील.
भाजपने जाहीर केली पहिली यादी, मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढणार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -