एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक फेम सुरज चव्हाण (Suraj Chavan) आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे (Prashant Shingate) निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुरज चव्हाणचे सोशल मीडियावर (Social Media) लाखोंच्य संख्येने चाहते आहेत. त्यांच्या बुक्कीत टेंगूळ या डायलॉगने तर पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. आता हाच सुरज त्याच्या चाहत्यांसमोर थेट हिरो म्हणून येणार आहे.
बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाण याचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे. मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले. नवोदित कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
टिकटॉकने मला रातोरात मोठे केले आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांतजी मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. लिहिता वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया सुरज चव्हाणने दिली आहे.
टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘गोलीगत’ भरारी, मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -