Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एपीआयच्या भावाची विष प्राशन करून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एपीआयच्या भावाची विष प्राशन करून आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाइन टीम

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याने नवीपेठमध्ये विष औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. विद्यार्थी मुळचा सांगली येथील असून त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलीस दलात साहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

अमर रामचंद्र मोहिते असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरने विषारी औषध प्राशन केले असावे. सकाळी तो उशीर झाला तरी उठला नाही त्यामुळे त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. तरी देखील त्याचा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अमरच्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलात असलेल्या भावाला माहिती दिली. त्याने याबाबत विश्रामबाग पोलिसांना कळविले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अमर त्यांना मृतावस्थेत मिळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी अमरजवळ कोणतीही चिठ्ठी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अमर हा मूळचा तासगाव सांगली येथील आहे.

मागील काही दिवसापासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला होता. दरम्यान नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची देखील चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -