Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 14 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना ‘आयपीएस’ केडर

राज्यातील 14 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना ‘आयपीएस’ केडर

ताजी बातमी ऑनलाइन टीम

महाराष्ट्र पोलीस दलात उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकार्‍यांचे प्रमोशन गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने 2019 आणि 2020 मध्ये आयपीएसची यादी जाहीर न करता तशीच ठेवली होती. त्यामुळे ही बढती रखडली गेली होती. अखेर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नती मार्गी लागली असून 14 अधिकार्‍यांना आयपीएस पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात हे अधिकारी इतर ठिकाणी जाणार की आहे त्याच ठिकाणी सेवा बजावणार याकडे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारने राज्यातील एकूण 14 अधिकार्‍यांना आयपीएसची पदोन्नती दिली आहे. खरे तर 2000 ते 2004 वर्षात महाराष्ट्र पोलीस दलात उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकार्‍यांचे प्रमोशन गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने 2019 आणि 2020 मध्ये आयपीएसची यादी जाहीर न करता तशीच ठेवली होती. त्यामुळे ही बढती रखडली गेली होती. अखेर काल मकरसंक्रांतीच्या दिवशी या अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश येऊन धडकले. त्यामुळे खर्‍या अर्थाने त्यांची मकरसंक्रांत गोड झाली

एन. ए. अष्टेकर, मोहन दहिकर, विश्वास पानसरे, वसंत जाधव, श्रीमती स्मार्तना पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, पी. एम. मोहिते, संजय लाटकर, यांच्यासह सुनील भारद्वाज, सुनिल कडासने, संजय बारकुंड, डॉ. डी. एस. स्वामी, अमोल तांबे, एस. पी. निशाणदार, अशा चौदा अधिकार्‍यांची बढती झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -