Saturday, July 5, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाकडे असा बॉलर जो दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी, जाणून घ्या त्याचं भारतीय...

ऑस्ट्रेलियाकडे असा बॉलर जो दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी, जाणून घ्या त्याचं भारतीय कनेक्शन


ऑस्ट्रेलियाने शनिवारी वेस्ट इंडिजला नमवून वर्ल्डकप अभियानाची दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने सहज शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियाकडून भारतीय वंशाच्या निवेतन राधाकृष्णने तीन विकेट घेतल्या. मूळचा चेन्नईचा असलेल्या निवेतनचा त्या निवडक खेळाडूंमध्ये समावेश होतो, जे दोन्ही हातांनी गोलंदाजी करु शकतात.

निवेतन मूळचा भारतीय आहे. तो 10 वर्षांचा असताना त्याचे आई-वडिल चेन्नहून सिडनीला स्थायिक झाले. ऑस्ट्रेलियातच निवेतनने क्रिकेटचे धडे गिरवले. क्रिकेटमध्ये करीयर करण्यासाठी त्यांने शाळेत शेवटच्यावर्षाचा अभ्यासही केला नाही. निवेतन 18 वर्षांचा आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय.

निवेतन डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांनी ऑफ स्पिन गोलंदाजी करु शकतो. त्याने पेस बॉलर म्हणून करीयरची सुरुवात केली होती.

निवेतनचे वडिल अन्बु सेल्वन यांनीच त्याला दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अन्बु स्वत: तामिळनाडूकडून क्रिकेट खेळले आहेत. सिडनीला जाण्याआधी निवेतनचा मोठा भाऊ निकेथन तामिळनाडूच्या अंडर-14 संघातून खेळला आहे. पण ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर त्याने क्रिकेट सोडले. पण निवेतनने क्रिकेट खेळणे सुरुच ठेवले. आधी त्याला ऑस्ट्रेलियाच्या अंडर-16 टीममध्ये स्थान मिळाले होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -