Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंगकोरोनाविरोधी लसीकरण अभियानाला एक वर्ष पूर्ण; आतापर्यंत किती डोस दिले जाणून घ्या...

कोरोनाविरोधी लसीकरण अभियानाला एक वर्ष पूर्ण; आतापर्यंत किती डोस दिले जाणून घ्या सविस्तर


कोरोनाविरोधी लसीकरण अभियानाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून एक टपाल तिकीट जारी करण्यात आले. तर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी मोहिमेत सामील असलेल्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे अभिनंदन केले. मागील एक वर्षाच्या काळात 156.76 डोसेस देण्यात आले असल्याची माहिती यानिमित्ताने सरकारकडून देण्यात आली.


कोरोनाविरोधी अभियानांतर्गत देशातील 92 टक्के लोकांना किमान एक तरी डोस देण्यात आलेला आहे. सरसकट टक्केवारीचा विचार केला तर 68 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 43.19 लाख बूस्टर डोस देण्यात आलेत. तर 15 ते 18 वयोगटातील युवकांना 3 कोटी 38 लाख 50 हजार 912 डोसेस देण्यात आले आहेत. मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य मंत्री मंडाविया यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले हे अभियान सर्वांच्या प्रयत्नाने जगातील सर्वात सफल अभियान ठरले असल्याचे मंडाविया यांनी नमूद केले. गतवर्षी 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. त्यावेळी पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील लोकांना आणि त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -