Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेकलियुगातला खरा श्रावणबाळ! वडिलांना पाठीवरुन 6 तास घेऊन फिरत होता मुलगा

कलियुगातला खरा श्रावणबाळ! वडिलांना पाठीवरुन 6 तास घेऊन फिरत होता मुलगा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

श्रावणबाळाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल. आपल्या आई-वडिलांना कावडीतून घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळासारखाच एक मुलगा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कलियुगातला श्रावणबाळ असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या मुलाने आपल्या वडिलांना पाठीवरून तब्बल 6 तास घेऊन पायी प्रवास केला.

ब्राझिलमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी वडिलांना पाठीवर घेऊन जाणारा व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये 24 वर्षीय तावी आपल्या 67 वर्षीय वडिलांना पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. वडिलांना लस देण्यासाठी त्याला वडिलांना घेऊन तब्बल 6 तास चालत अंतर गाठावं लागलं.


या तरुणाला तब्बल 12 तासांची पायपीट करावी लागली. डॉ सिमोस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की मुलगा आणि वडील यांच्यातील प्रेमळ नातेसंबंधाचा एक अतिशय सुंदर पुरावा हा फोटो आणि ही घटना आहे.

देशात कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहीम सुरू असताना जानेवारी 2021 मध्ये हा फोटो काढण्यात आला. डॉ सिमोस यांनी या वर्षी 1 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये त्यांनी 2021 मधील उल्लेखनीय क्षण असं म्हटलं आहे.

या फोटोवरून तिथे काय परिस्थिती असेल याचा अंदाज येऊ शकतो. ब्राझिल सारख्या देशामध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबवणं किती कठीण आणि अनेक अडचणी येऊ शकतात हे यावरून दिसत आहे. कोरोनामुळे 853 लोकांचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -