Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगसंकेश्वर येथे भरदिवसा महिलेची गोळी घालून हत्या

संकेश्वर येथे भरदिवसा महिलेची गोळी घालून हत्या

ताजी बातमी ऑनलाइन टीम

बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर (ता. हुक्केरी) शहरात आज (रविवार) एका महिलेची अज्ञातांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या घटनेने संकेश्वर शहर हादरले असून, पोलिसांकडून मारेकऱ्यांचा तपास सुरु आहे.



शैला निरंजन सुभेदार (वय 56) असे हत्‍या झालेल्‍या महिलेचे नाव आहे. गोळीबार झाल्यानंतर मारेकर्‍यांनी पलायन केले असून, संकेश्वर शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.


फरार शूटर्सच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. शांत शहर अशी ख्याती असलेल्या संकेश्वर शहरात भर दिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -