Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनमुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर...

मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर काहीच नाही!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

राजकीय भूमिका घेतली म्हणून अभिनेता किरण माने (Kiran mane) यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. असा आरोप स्वत: किरण माने यांनी केला आहे. त्यामुळे ‘मुलगी झाली हो’च्या प्रोडक्शनवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच. तो माझा हक्कच आहे, असा निर्धारच किरण माने यांनी बोलून दाखविला आहे. तसेच मी बी कंबर कसलेली हाय म्हणत फेसबुकवर पोस्ट शेअर करत किरण माने यांनी सर्वांना इशाराच दिला आहे.


आता यासंदर्भात अजून एक बातमी येते आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मयुरेश्वर या ठिकाणी मुलगी झाली हो मालिकेचे शुटिंग सुरू आहे. मात्र, काही लोकांनी या शुटिंगला विरोध केल्याचे समजते आहे. सध्यातरी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून तांत्रिक बाबीची पुर्तता केल्याशिवाय हे चित्रीकरण बंद करता येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता किरण माने आणि मुलगी झाली हो’च्या प्रोडक्शनमधील वाद चिघळण्याचीच शक्यता आहे.


किरण माने यांना मालिकेतून काढण्यामागे व्यावसायिक कारणं दिलं गेलं असल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय पोस्ट किंवा राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढले नाहीये, असे सांगितले जात आहे. दरम्यान, नेमकी व्यावसायिक कारण देताना कोणत्या बाबी किरण माने यांच्याबाबत खटकल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुलगी झाली हो मालिकेत काम करणाऱ्या किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर मराठी कलाकार आणि राजकीय भूमिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -