ताजी बातमी ऑनलाइन टीम
बेळगाव जिल्ह्यात रुबेलाची लस घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे लस घेतलेल्या अन्य बालकांच्या पालकात देखील भीतीचे वातावरण
निर्माण झाले आहे. रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील पवित्रा हुलगुर (१३जिल्ह्यातील महिने), मधु उमेश घटना
कुरगुंडी (१४ महिने) आणि मल्लापुर गावातील
चेतन (१५ महिने) अशी मृत बालकांची नावे आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्य खात्याने घेतली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.व्ही.मुन्याळ यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून मृत बालकांचे रक्ताचे नमुने, त्यांच्या लघवीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
शव विच्छेदन अहवाल आणि तपासणीचे अहवाल आल्यावर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील सालहळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूबेलाची लस देण्यात आली होती. बारा जानेवारीला प्राथमिक आरोग्य केंद्रात एकवीस बालकांना रुबेलाची लस देण्यात आली होती. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनी बालकांना लस दिली होती. लस घेतल्यानंतर काही बालकांना उलटी, ताप असा त्रास सुरू झाला. याची माहिती आशा कार्यकर्त्यांना दिल्यावर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचा सल्ला दिला. लस घेतलेल्या जवळजवळ पंधरा बालकांना त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू केले. पाच जणांची अवस्था गंभीर झाल्यामुळे त्यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन बालकांचा मृत्यू झाला. एका बालकाची अवस्था गंभीर आहे. आणखी एका बालकाला रक्त देण्यात येत असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. बालकांना रुबेला लस प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली तेथेच कोव्हिडची दुसरी लसही नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे देखील मुलांचे आरोग्य बिघडले असण्याची शक्यता ग्राम पंचायत सदस्य भिमशी हादीमनी यांनी व्यक्त केली आहे. लस घेतलेल्या बालकांचा मृत्यू कसा झाला याची माहिती घेणार आहे. लस घेतलेल्या बालकांना ताप, उलट्या होवून मृत्यू झाला आहे, असेही भिमशी हादीमनी यांनी सांगितले.
रुबेलाची लस घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा मृत्यू
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -