कायमचे दुष्काळाचे चटके सोसत स्थानिक पशुपालक शेतकर्यांनी मांस व लोकर यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माडग्याळ मेंढी विकसित केली. त्याला चांगली मागणी आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळच्या या मेंढीला जीआय मानांकन मिळाल्यास ब्रँड म्हणून मार्केटिंग करणे सोपे जाणार आहे. याचा मेंढी उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे.
ही देशी मेंढीचीच जात आहे आणि ती येथील पशुपालक व शेतकर्यांनी विकसित केली आहे. या मेंढीला आता मागणी वाढत असल्यामुळे तिची किंमतही वाढते आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढी एक ब्रँड बनते आहे.
खिलारी जनावरांसाठी आणि माडग्याळ जातीच्या मेंढ्यांसाठी जत तालुका प्रसिद्ध आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून येथे पशुपालन केले जाते. विक्रीसाठी पशुखाद्य, खुराक घालून शेळ्या-मेंढ्यांची जोपासना करतात.
माडग्याळ मेंढीची मागणी वाढू लागल्यामुळे किमतीही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे माडग्याळ आणि परिसरातील कुणीकोनूर, गुड्डापूर, व्हसपेठ, आबाचीवाडी, कुलाळवाडी अशा अनेक गावांत मोठ्या प्रमाणात माडग्याळी मेंढ्या पाळल्या जातात.अनेक पशुपालक शेतकरी या मेंढीची लाखात विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढले आहे.
सांगली : माडग्याळ मेंढीला हवे जीआय मानांकन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -