कोविड-19 चा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य मंत्रालयाने कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यात नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अनेक जण कापडी मास्क वापरत आहेत. मात्र हा कापडी मास्क कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी आहेत का? यावर एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून समोर आलेल्या आहवालात कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कापडी मास्क पुरेसा नाही असा दावा करण्यात आला आहे. मॅसॅच्युसेट्समधील तीन मोठ्या शहरांनी (बोस्टन, वॉर्सेस्टर आणि स्प्रिंगफील्ड) इनडोअर मास्क अनिवार्य केले आहेत आणि ते परिधान करण्याचे आदेश दिले आहेत.
वॉर्सेस्टर मेडिकल डायरेक्टर आणि यूमास मेमोरियल हेल्थमधील बालरोग ट्रॉमाचे संचालक डॉ. मायकेल हिर्श म्हणाले की कापडाचा मास्क किंवा चेहऱ्याला कोणतेही कापड बांधून ओमिक्रॉन टाळता येत नाही. आपल्याकडे चांगला मास्क असणे आवश्यक आहे. मायकेल हिर्श पुढे म्हणाले की, म्हणाले की कोविड-19 टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डोळ्यांना चष्मा लावणे आणि फेस मास्क घालणे. याशिवाय लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका ग्राफिकनुसार कोविड-19 बाधित व्यक्ती आणि एक सामान्य व्यक्ती N95 मास्क घालून एकत्र बसले असेल तर हा मास्क 25 तास संरक्षण देईल आणि ओमिक्रॉनपासून संरक्षण करेल. दुसरीकडे सर्जिकल मास्क केवळ एक तासापर्यंत संरक्षण करू शकतात. KN95 95 मास्क 85 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान गव्हर्नर चार्ली बेकर यांनी दिली.
ओमिक्रॉनपासून बचावासाठी कपड्याचा मास्क निरोपयोगी?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -