ताजी बातमी ऑनलाइन टीम
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली आणि पाचव्याच षटकात त्यांनी पहिली विकेट गमावली. बुमराहने मलानला बाद करत त्यांना पहिला झटका दिला. सध्या संघाची धावसंख्या १७ षटकांत २ बाद ६६ आहे.
१५ व्या षटकानंतर ब्रेक घेण्यात आला. हा ब्रेक संपल्यानंतर आर अश्विने १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर द. आफ्रिकेला दुसरा झटका दिला. त्याने डिकॉकला क्लिन बोल्ड केले. ऑफ स्टंपवर चेंडू गुड लेंथवर फेकला. त्यानंतर चेंडू इन स्विंग झाला. डीकॉकला हा चेंडू खेळता आला नाही. तू अश्विनच्या जाळ्यात अडकला आणि चेंडू स्टंप्सवर जावून आदळला.
भारताचा संघ
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
द. आफ्रिकेचा संघ
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), येनेमन मलान, एडेन मार्कराम, रायसे व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को येन्सेन, केशव महाराज, तबरीझ शम्सी, लुंगी एन्गिडी.
पहिली आठ षटके बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी टाकली. त्यानंतर गोलंदाजीत बदल करण्यात आला. बुमराहला थांबवून ९ व्या षटकात शार्दुल ठाकूरला चेंडू देण्यात आला. शार्दुलने फेकलेल्या या षटकात ४ धावा दिल्या. त्यानंतर १२ व्या षटकात चेंडू आर अश्विनकडे सोपवण्यात आला आणि भुवनेश्वर कुमारला थांबवण्यात आले. या षटकात अश्विनने ६ धावा दिल्या.
जसप्रीत बुमराहने भारताला पाचव्याच षटकात पहिले यश मिळवून दिले. बुमराहने त्याच्या आधीच्या षटकात इन स्विंगचा मारा केला. पण बुमराहच्या या आक्रमणाचा मलानने यशस्वी बचाव केला. मात्र, पुढच्या षटकात बुमराहने रणनिती बदलली. यावेळी पाचव्या षटकाचा दुसरा चेंडू टाकताना त्याने मलानला चकवले. हा चेंडू मलानने पाय क्रिझमध्ये ठेवत बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पण खेळपट्टीवर चेंडू पडताच तो आऊट स्विंग झाला. मलानने कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन विकेटकीपर ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. मलानने १० चेंडूत ६ धावा केल्या. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्या १० षटकांतील मलानची विकेट ही बुमराहची पहिली विकेट ठरली.
व्यंकटेश अय्यरला भारताकडून वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आर अश्विनने ५ वर्षांनंतर वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे. तो शेवटचा वनडे २०१७ मध्ये खेळला होता. केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार होणारा भारताचा २६ वा खेळाडू तर वेंकटेश अय्यर वनडेमध्ये पदार्पण करणारा टीम इंडियाचा २४२ वा खेळाडू ठरला. दुसरीकडे द. आफ्रिकेच्या संघालडून मार्को जेन्सनही वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे.
आफ्रिकेचे अर्धशतक, बावुमा-डी कॉकने डाव सावरला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -